कोरडिया काष्ठीं अंकूर – संत भानुदास अभंग काला – ९१
कोरडिया काष्ठीं अंकूर फुटले ।
येणें येथें जालें विठोबाचे ॥१॥
समर्थाचा आम्हीं धरिला आधार ।
जाणोंनी सत्वर आला येथें ॥२॥
माझिये संकटीं आलासी धांऊनी ।
भानुदास चरणीं लागतसे ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
कोरडिया काष्ठीं अंकूर – संत भानुदास अभंग काला – ९१