अद्वय आनंद तो – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – ९
अद्वय आनंद तो हा परमानंद ।
शोबहे सच्चिदानंद विटेवरी ॥१॥
सांवळें रूपडें गुणा आगोचर ।
उभा कटीं ठेऊनी विटे ॥२॥
पीतांबर परिधान चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठीं वैजयंती ॥३॥
भानुदास म्हणे ब्रह्मा अगोचर ।
नेणवे विचार ब्रह्मादिकां ॥४॥