गाई गोप विप्राचार – संत भानुदास अभंग काला – ८८

गाई गोप विप्राचार – संत भानुदास अभंग काला – ८८

गाई गोप विप्राचार संध्यावंदन ।
अपूज्य लिंगा पूजन साधू दरुशन ॥१॥
जयजय सुशब्द बोलती जन ।
कोटि युगें राज्य करीं रघुनंदन ॥२॥
भरत शत्रुघ्र जवळी लक्ष्मण ।
शौर्य विद्या साजे रघुनंदन ॥३॥
कौसल्या सुमित्रा वोवाळिती रामातें ।
देवा भानुदास गुण गातसे तेथें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गाई गोप विप्राचार – संत भानुदास अभंग काला – ८८