गूढीयेसी सांगु आलें – संत भानुदास अभंग काला – ८७

गूढीयेसी सांगु आलें – संत भानुदास अभंग काला – ८७

गूढीयेसी सांगु आलें ।
कंस चाणूर मर्दिले ॥१॥
हर्ष नाचताती भोजें ।
जिंकियेले यादवराजें ॥२॥
गुढी आली वृंदावना ।
मथुरा दिली उग्रसेना ॥३॥
जाला त्रिभुवनीं उल्हास ।
लळीत गाये भानुदास ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गूढीयेसी सांगु आलें – संत भानुदास अभंग काला – ८७