अवघ्या सोडियेल्या – संत भानुदास अभंग काला – ८६
अवघ्या सोडियेल्या मोटा ।
आजीचा दहिंकाला गोमट ॥१॥
घ्या रे घ्या रे दहींभात ।
आम्हां देतो पंढरीनाथ ॥२॥
मुदा घेऊनियां करीं ।
पेंद्या वांटितो शिदोरी ॥३॥
भानुदास गीतीं गात ।
प्रसाद देतो पंढरीनाथ ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अवघ्या सोडियेल्या – संत भानुदास अभंग काला – ८६