तुझिया रुपाची आवडी मज देवा । वाचेसी तो हेवा रामनाम ॥१॥ श्रवनीं ऐकेन तुमचे पोवाडे । दुजे वाडेंकोंडें न करीं कांहीं ॥२॥ चरणें प्रदक्षिणा घालीन लोंटागणा । वंदीन चरणा संताचिया ॥३॥ भानुदास म्हणे हीच मति स्थिर । रामराम निर्धार गाईन मुखीं ॥४॥