तुझिया रुपाची आवडी – संत भानुदास अभंग करूणा – ७५
तुझिया रुपाची आवडी मज देवा ।
वाचेसी तो हेवा रामनाम ॥१॥
श्रवनीं ऐकेन तुमचे पोवाडे ।
दुजे वाडेंकोंडें न करीं कांहीं ॥२॥
चरणें प्रदक्षिणा घालीन लोंटागणा ।
वंदीन चरणा संताचिया ॥३॥
भानुदास म्हणे हीच मति स्थिर ।
रामराम निर्धार गाईन मुखीं ॥४॥