माझा तो भरंवसा – संत भानुदास अभंग करूणा – ७४
माझा तो भरंवसा तुझे नामीं आहे ।
येणें कार्य होय आमुचें देवा ॥१॥
तूं जगाचें जीवन मनाचें मोहन ।
ब्रह्मा सनातन तूंचि देवा ॥२॥
जंगम जगीं प्रकाशला ।
हा अचोज अबोला दिसे देवा ॥३॥
भानुदास म्हणे विश्रांतीसी स्थान ।
पंढरीवांचून दुजें नाहीं ॥४॥