भाकितों करुणा पंढरीच्या – संत भानुदास अभंग करूणा – ७१

भाकितों करुणा पंढरीच्या – संत भानुदास अभंग करूणा – ७१

भाकितों करुणा पंढरीच्या राया ।
अगा यादवराया श्रीकृष्णरामा ॥१॥
तूं माय माउली जीवीं जीवनकळा ।
भक्ताचा लळा पुरविसि ॥२॥
आवडे साबडे भक्ताचें कीर्तन ।
नाचसी येऊन निरभिमानें ॥३॥
भानुदास म्हणे पुरवीं माझे लळे ।
विठठले सांवळे माऊलीये ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भाकितों करुणा पंढरीच्या – संत भानुदास अभंग करूणा – ७१