दीन आम्हीं रंक – संत भानुदास अभंग करूणा – ६९
दीन आम्हीं रंक पतीत पतीत ।
पावन तूं अनंत स्वामी माझा ॥१॥
धरला भरवसा नामावरी चित्त ।
नाहें दुजा हेत मनीं कांहीं ॥२॥
देणें घेणें नको पुरला मनोरथ ।
बोलणें ती मात वेगळी असे ॥३॥
भानुदास म्हणे अहो पंढरीराया ।
कृपा करी सखया धरी हातीं ॥४॥