अनाथाचा नाथ भक्तांचा – संत भानुदास अभंग करूणा – ६८

अनाथाचा नाथ भक्तांचा – संत भानुदास अभंग करूणा – ६८

अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी ।
ऐसें चराचरी ब्रीद गाजे ॥१॥
तें आम्हां सांपडले सोपें वर्म हातां ।
म्होणोनि अच्युता बोलतसों ॥२॥
आम्हीं पतितांनीं घालावें सांकडें ।
उगवणें कोडें तुमचें हातीं ॥३॥
भानुदास विनवी चरणीं ठेवुनि माथा ।
सांभाळी अनाथनाथा आम्हांलागीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अनाथाचा नाथ भक्तांचा – संत भानुदास अभंग करूणा – ६८