आशेचिया सोसें गुंतसी – संसंत भानुदास अभंग मुमुक्षूसबोध – ५३
आशेचिया सोसें गुंतसी पामरा ।
न चुकती वेरझारा चौर्याशींच्या ॥१॥
मदाचिया सोसें गुंतसी पामरा ।
न चुकती वेरझारा चौर्यांशींच्या ॥२॥
तृष्णेचिया सोंसे धांवंशी पामरा ।
न चुकती वेरझारा चौर्याशींच्या ॥३॥
कल्पनेच्या मागे धांवशी कल्पका ।
न पावसीं सुखा बुडसी वायां ॥४॥
भानुदास म्हणे सर्व हें सोडुनी ।
एक चक्रपाणी सखा करीं ॥५॥