जोडीचे घोंगडें येव्हढीये – संत भानुदास अभंग अद्वैत – ५
जोडीचे घोंगडें येव्हढीये राती ।
कानींची कुंडले करी जगा ज्योति ॥१॥
वोळखिला वोळखिला खुणा ।
वोळखिला माय पंढरीचा राणा ॥२॥
होये न होये ऐसा संशय गमला ।
निर्धारितां विश्वव्यापक देखिला ॥३॥
हृदयमंदिरीं दाटोनी धरावा ।
ही खुण सांगे भानुदास देवा ॥४॥