नामाचा महिमा शुक – संत भानुदास अभंग नाममहिमा – ३९

नामाचा महिमा शुक – संत भानुदास अभंग नाममहिमा – ३९

नामाचा महिमा शुक सांगे ।
परिक्षिती राजा जाणे अंगें ॥१॥
जपतांचि रामकृष्ण नामें ।
दहन होतीं कर्माकर्में ॥२॥
नामें दया शांति क्षमा ।
नामें शीतळ शंकर उमा ॥३॥
नाम जप ध्यानीं मनीं ।
भानुदास वंदितो चरणीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामाचा महिमा शुक – संत भानुदास अभंग नाममहिमा – ३९