आमुचिये कूळीं पंढरीचा – संत भानुदास अभंग नाममहिमा – ३६
आमुचिये कूळीं पंढरीचा नेम ।
मुखीं सदा नाम विठ्ठलांचें ॥१॥
न कळे आचार न कळे विचार ।
न कळे वेव्हार प्रपंचाचा ॥२॥
असों भलते ठायीं जपूं नामावळी ।
कर्माकर्म होळी होय तेणें ॥३॥
भानुदास म्हणे उपदेश आम्हां ।
जोडिला परमात्मा श्रीराम हा ॥४॥