आवडोनि कर कटीं – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३५
आवडोनि कर कटीं ।
पाऊलें नेंहटीं विटेवरी ॥१॥
त्याचा छंद माझे जीवा ।
नाहीं देवा आणिक ॥२॥
काया वाचा आणि मन ।
लोभलें सगुण रुप देखतां ॥३॥
भानुदास म्हणे दृष्टी ।
पहातां गोमटी मूर्ति ते ॥४॥
आवडोनि कर कटीं ।
पाऊलें नेंहटीं विटेवरी ॥१॥
त्याचा छंद माझे जीवा ।
नाहीं देवा आणिक ॥२॥
काया वाचा आणि मन ।
लोभलें सगुण रुप देखतां ॥३॥
भानुदास म्हणे दृष्टी ।
पहातां गोमटी मूर्ति ते ॥४॥