धर्मशास्त्रीं आहे नीत – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३४

धर्मशास्त्रीं आहे नीत – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३४

धर्मशास्त्रीं आहे नीत ।
पुनीत क्षेत्र सप्तपुर्‍या ॥१॥
काशी आदि असती सप्त ।
परि पवित्र पंढरी ॥२॥
न बाधीच पापलेश ।
ऐसा उल्हास नामाचा ॥३॥
सदाकाळीं वैष्णवजन ।
गातीं पावन रामहरी ॥४॥
धन्य त्यांचा रहिवास ।
नित्य गातो भानुदास ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धर्मशास्त्रीं आहे नीत – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३४