पंढरींचें सुख पाहतां – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३३
पंढरींचें सुख पाहतां अलौकिक ।
वैकुंठनायक उभा जेथें ॥१॥
देवां जें दुर्लभ भक्तांसी सुलभ ।
रुक्मिणीवल्लभ उभा विटे ॥२॥
वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ ।
त्यामाजीं गोपाळ सप्रेमें नाचे ॥३॥
जिकडे पाहे तिकडे होय ब्रह्मानंद ।
भानुदास आनंदे गात असे ॥४॥