भाविकासाठीं उभा – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – ३२
भाविकासाठीं उभा ।
विठु कैवल्याचा गाभा ॥१॥
युगें झालीं अठ्ठाविस ।
उभा पुंडलिका पाठीसा ॥२॥
न मानी कांही शीण ।
उभा तिष्ठत अज्ञोन ॥३॥
ऐसा कृपाळु दीनाचा ।
भानुदास म्हणे साचा ॥४॥
भाविकासाठीं उभा ।
विठु कैवल्याचा गाभा ॥१॥
युगें झालीं अठ्ठाविस ।
उभा पुंडलिका पाठीसा ॥२॥
न मानी कांही शीण ।
उभा तिष्ठत अज्ञोन ॥३॥
ऐसा कृपाळु दीनाचा ।
भानुदास म्हणे साचा ॥४॥