परलोकींची वस्तु – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – २९
परलोकींची वस्तु पंढरीसी आली ।
ती दैवे फावली पुंडलिका ॥१॥
घेतां देतां लाभ बहुतांसी जाला ।
विसावा जोडला पांडुरंग ॥२॥
न करितां सायास वस्तुची आयती ।
वैष्णवीं बहुतीं वेटाळिलीं ॥३॥
भानुदासस्वामी कृपेचा सागरु ।
विठ्ठल कल्पतरु वोळला आम्हां ॥४॥