न मागतां कांहीं – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – २७

न मागतां कांहीं – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – २७


न मागतां कांहीं न करिता सेवा ।
आलासी या देवी पंढरीये ॥१॥
तुं गा मायबाप विश्वासी तारक ।
तुवा पुंडलिक सुखी केली ॥२॥
चारिता गोधनें आलासी बा पायीं ।
पुंडलिक काहीं न बोलेची ॥३॥
चिन्मयाचा दीप साक्षीत्वासी आला ।
भानुदास त्याला नाम झालें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न मागतां कांहीं – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य- २७