न येसी योगियांच्या ध्याना – संत भानुदास अभंग पंढरीमाहात्म्य – २३
न येसी योगियांच्या ध्याना । अन बैसरसी मुनीजनांच्या मना ।
तो तुं पंढरीचा राणा । भीमातीर निवासी ॥१॥
साक्ष अससीं सर्वाभूतिं । असुनीं न दिसे जगतीं ।
पांडुरंग बालमूर्ति । प्रगट उभी विटेवरी ॥२॥
न कळे शास्त्रिकां संवाद । शब्दीं न सापडे बोधा ।
तो तुं उभा परमानंद । पुंडलिक द्वारीं ॥३॥
वेद अचोज आंबुला । श्रुति करती गलबला ।
तो तु घननीळ सांवळा । भानूदासा अंतरीं ॥४॥