आलों दृढ धरुनी – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – २०
आलों दृढ धरुनी जीवीं ।
तो गोसावी भेटला ॥१॥
जन्ममरण हरला पांग ।
तुटला लाग प्रपंच ॥२॥
इच्छा केली ती पावलों ।
धन्य जाहलों कृतकृत्य ॥३॥
भानुदास म्हणे देवा ।
घ्यावी सेवा जन्मोजन्मीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आलों दृढ धरुनी – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – २०