जन्मोजन्मीं आम्हीं बहु – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १९
जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें ।
म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥१॥
जन्मोनी संसारीं जाहलों त्यांचा दास ।
माझा तो विश्वाचा पांडुरंगीं ॥२॥
आणिका दैवता नेघे माझें चित्त ।
गोड गातां गीत विठोबाचें ॥३॥
भ्रमर मकरंदा मधासी ती माशी ।
तैसें या देवासी मन माझें ॥४॥
भानुदास म्हणे मज पंढरीची न्या रे ।
सुखें मिरवा रे विठोबासी ॥५॥