उन्मनीं समाधीं नाठवे – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १८

उन्मनीं समाधीं नाठवे – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १८

उन्मनीं समाधीं नाठवे मनासी ।
पहातां विठोबासी सुख बहु ॥१॥
आनंदाआनंद अवघा परमानंद ।
आनंदाचा कंद विठोबा दिसे ॥२॥
जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे ।
पाहतां साठवे रूप मनीं ॥३॥
नित्यता दिवाळी नित्यता दसरा ।
पाहतां साजिरा विठ्ठलदेव ॥४॥
भानुदास म्हणे विश्रांतींचें स्थान ।
विठ्ठल निधान सांपडलें ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उन्मनीं समाधीं नाठवे – संत भानुदास अभंग श्रीविठ्ठलमाहात्म्य – १८