संत भानुदास

संत भानुदास अभंग मांभळभट

संत भानुदास अभंग मांभळभट गाथा – १ अभंग

९३

कंसराव चिंता करी । नवल बालकाची परी ।
या गोकुळामाझारीं एक अरिष्ट वर्तलें ॥१॥
आमुच्या सकळिका प्रधाना । माजी बलिवंत पूतना ।
विष भरोनियां स्तना । पांजुं तया पाठविली ॥२॥
तवं तो वेताळ कीं पिशाच्च । काळभैरव कीं राक्षस ।
त्याने केला तिचा ग्रास । विषासहित शोषिलें ॥३॥
तों अवतरला गोकुळीं । दैत्य दानव मर्दन बळी ।
जिनें बाळकें शोषिलीं । तेहि शोषिली पूतना ॥४॥
आम्हीं दुष्टबुद्धि केली । बहिण देवकी पीडिली ।
तेची बाळकें वधिलीं । आपुलें अरिष्ट चुकवावया ॥५॥

तंव ते न चुकतां पातले । विघ्न नसतांचि उगवलें ।
आम्हीं जाणतों इतुलें । तरी कृश्ण आणा बांधुनी ॥६॥
एवं माभळभट उठिला । तेणे विडा मागितला ।
निरंजनीं सांडवीन तान्हुला । जो गोकुळीं वाढतसे ॥७॥
ऐसें वचन ऐकोनी । विडा दिधला ततक्षणीं ।
आपुल्या आश्रमा जाऊनी । काय करिता जाहला ॥८॥
मग बोले स्त्रियेसी । आम्ही जातों गोकुळासी ।
बाळक जालें यशदेसी । तें सांडवीन निरंजनी ॥९॥
ऐसें बोलोनी निघाला । मार्गीं जातसे एकला ।
तंव श्रीकृष्ण हासिन्नला । हा विप्र भ्रमित जालासे ॥१०॥

गोकुळ ठाकिलें बिडालें । देखे उपलिया धवलारे ।
तेथीचीं माणसें अति नांगरें । लेणीं लुगड़ी मिरवती ॥११॥
कृष्ण अवेधें वेधलीं । अवघीं देवरुप जाहलीं ।
वाचेसी सरस्वती आली । तैसें मधुर बोलती ॥१२॥
आला नंदाच्या मंदीरा । उपमा दिसे क्षीणसागरा ।
तेथीच्या गौळणी असती सुंदरा । परिये देती कृष्णातें ॥१३॥
वृद्ध बहुकाळ ज्योतिषी । देखोनि हारिखली मानसीं ।
यशोदा लागली पायासी । साउमेयासी म्हणीतलें ॥१४॥
पाट बैसकेचा घातला । पुढें तिसरा ठेविला ।
येरें आशिर्वाद दिधला । मग कुशलता पुसिली ॥१५॥

तंव त्या कृष्णातें दाविती । पहा हो याची जन्मतिथी ।
येरें उकलिती प्रीती । चंक्रांकिता साजिरी ॥१६॥

शनि मंगळराहु केतु । दुष्ट ग्रह ऐसें सांगतु ।
रोहिणी नक्षत्रु अष्टमी आंतु । भिन्नरात्री उपजला ॥१७॥
पुढें विघ्न असें थोर । मागें एक चुकलें गंडांतर ।
कंसरायाचे भय फार । या बाळकासी असे ॥१८॥
दैत्य करिती वळवळा । मेघ वर्षती शिळा ।
गोकुळ सांडुन अवघे पळा । ऐसा अनर्थ होईल ॥१९॥
पुत्र नव्हें हो लहाणा । हा तुम्हे वोपा कां पोसणा ।
हासिन्नला यादवराणा । मग विंदान मांडिलें ॥२०॥

होता बैसकेचा पाटु । तेणें घेतला उचाटु ।
पिढीयाचा खडखडाटु । घरोघरीं सुटला ॥२१॥
भट वाचित होता पाताडें । तें तंव मुखीं आदळालें पिढें ।
येर सुजविलें थोबाडे । मग भयबीत पळतु ॥२२॥
रागे सुजविलें पाताडें । म्हणे गौळिये लाताडें ।
आम्हां जोशिया केव्हडे । पिढेंदान दिधलें ॥२३॥
तंव त्या विशाळ काठवटी । लागती माभळभटापाठीं ।
तिवया सिराळीं तिखटीं । पाठीं पोटीं रुपताती ॥२४॥
तेला तुपाचींमापें । डवले खोडवे आमुपें ।
बडगे खुंटे खुटें भलिया कोपें । पूजा बांधती मस्तकीं ॥२५॥

थोर आवेशा चढले चाटु । म्हणती यातें सगळें घाटु ।
लाटणें म्हणती भोईसी लाटुं । ऐसा दृष्ट काय किजे ॥२६॥

शाळिग्राम गडबडिले । देवपाट साह्र आले ।
अर्गळांचे सळ सुटले । खिळखिंळिलें खिळखंबे ॥२७॥
थोर विसुरा केला डांगीं । मार्ग रुंधिला चौरंगीं ।
मुसळें कांडावयालागीं । भोंवता वेढा घातला ॥२८॥
होते रवियांचे नाथलें । देह नवनीतें माखिलें ।
तें येऊन सर्वागी बैसलें । हिवें ऐसें मवाळ ॥२९॥
नव्हे नव्हे गा जोशी । राख राख हृषीकेशी ।
उखळा मुसळांचिया राशी । दाही दिशा व्यापिल्या ॥३०॥

पाठीं पिढियाम्छॆ मेळ । तिहीं झांकिलें रविमंडळ ।
गजबजिलें लोकपाळ । नव्हें गोकूळ सोपारें ॥३१॥
माभळभटाचिया झडपणीं । देखोनि पळालिया गौळणी ।
दह्मा दुधाचिया सांजवणीं । पिढा भरणी फुटती ॥३२॥
देखे मांदियाचे थाट । त्यामाजीं शीरे माभळभट ।
म्हणे गोकुळींचा शेवट । दैवयोगें पातलों ॥३३॥
शेतीं होती तिफणीं । नांगर कुळवांची रुमणीं ।
पाठीं लागलिया दणाणी । भटजी आमुचा स्वयंपाक ॥३४॥
ब्राह्मण म्हणोनि राखिला । धोत्रे पाताड्या मुकला ।
मथुरा प्रांत ठाकिला । नग्न हिंडे राजबिंदीं ॥३५॥

देखोनि दैत्यसभा घन दाट । उठा उठा आले पाट ।
धापा फुटो पाहे पोट । पुसे वाट घराची ॥३६॥
कंसासी सांगतिला वृत्तांतु । अझून काय रे निश्चितु ।
बळिया वैकुंठीचा नाथु । तो गोकुळीं वाढतसे ॥३७॥
ते वेळी कागासुर बकासुर । तृणावर्त दैत्य आघासुर ।
मुष्टिक चाणुर वीर । तिहीं विडे मागितले ॥३८॥
थोर बोलती पैजा । आम्ही निर्दाळुं बोजा ।
ये कथेसीचित्त दीजा । विनवो तुम्हा संतानोम ॥३९॥
देवा भानुदास म्हणें । श्रोतें कोपतील झणें ।
पंढरीरायाचे योगाने । हा विनोद गाइला ॥४०॥

संत भानुदास अभंग मांभळभट समाप्त


हे पण वाचा: संत भानुदास यांची संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *