येरी म्हणे मज काय देतां स्वामी – संत बंका अभंग
येरी म्हणे मज काय देतां स्वामी ।
उच्छिष्टांचे आम्ही धणी असों ॥१॥
तुमचे कृपेचा प्रसाद तुम्ही ठेवा ।
तोचि प्रिय देवा आहे आम्हां ॥२॥
येरु म्हणे घास घेई माझा करीं ।
मूल तें निर्धारीं होइल तुज ॥३॥
ऐकतां आनंदे घाली लोटांगण ।
वंदिले चरण जीवेंभावें ॥४॥
वंका म्हणे ऐसें लाघव करोनी ।
गेलासे निघोनी चक्रपाणी ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.