येणे जाणें दोनी खुंटले मारग – संत बंका अभंग

येणे जाणें दोनी खुंटले मारग – संत बंका अभंग

येणे जाणें दोनी खुंटले मारग ।
अवघा केला त्याग इंद्रियांचा ॥१॥
एक धरिला मनीं पंढरीचा राणा ।
वेदशास्त्र पुराण अकळ तो ॥२॥
आगमनाची आटी निगमा नकळे ।
बहुत शीणले वाखाणितां ॥३॥
वंका म्हणे तो हा पहा विटेवरी ।
पाउलें गोजिंरी कर कटी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येणे जाणें दोनी खुंटले मारग – संत बंका अभंग