सुखाचा सागर चोखा हा निर्धार – संत बंका अभंग
सुखाचा सागर चोखा हा निर्धार ।
काय मी पामर गुण वानूं ॥१॥
धन्य प्रेमपान्हा पाजुनियां मातें ।
केलें असे सरतें आपणामाजी ॥२॥
आनंदी आनंद दाविलासे डोळा ।
दिली जीवनकळा माझी मज ॥३॥
वंका म्हणे माझी प्रेमाची माउली ।
कृपेची साउली केली मज ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.