पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा – संत बंका अभंग

पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा – संत बंका अभंग

पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा ।
निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥
तारीतासे एका नावासाठी जगा ।
ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥
गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें ।
प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥
वंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा ।
मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा – संत बंका अभंग