गोकुळी लाघव गौळीयांचे घरी – संत बंका अभंग
गोकुळी लाघव गौळीयांचे घरी ।
रांगता श्रीहरी स्वयें झाला ॥१॥
दही दूध लोणी चोरोनियां खाये ।
नही म्हणोनि वाहे आण माते ॥२॥
गाई चारी सुखें करीतसे काला ।
ठकवी देवाला ब्रह्मादिकां ॥३॥
वंका म्हणे ऐसा लाघवी सूत्रधारी ।
किर्ति चराचरी वाढलीसे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.