आधींच निर्मळ वदन सोज्वळ – संत बंका अभंग
आधींच निर्मळ वदन सोज्वळ ।
विठोबा दयाळ पंढरीये ॥१॥
समचरण गोड गोजिरी पाउलें ।
कर मिरवले कटवरी ॥२॥
ध्यान दिगंबर तुळशीमाळा गळा ।
पांघुरला पिंवळा पीतांबर ॥३॥
वंका म्हणे सर्व सुखाचे आगर ।
तो हा विटेवर विठ्ठल देवो ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.