आदिनाथें उपदेश पार्वतीस केला - संत बहिणाबाई पाठक अभंग

जालें समाधान ब्राह्मणाच्या शब्दें – संत बहिणाबाई अभंग

जालें समाधान ब्राह्मणाच्या शब्दें – संत बहिणाबाई अभंग


जालें समाधान ब्राह्मणाच्या शब्दें ।
स्वप्नामाजीं पदें आठविती ॥ १ ॥
परी अंतरींच तुकोबाचें ध्यान ।
दर्शनावांचोन रितसें ॥ २ ॥
जयाचिया पदें होतसे विश्रांती ।
तेचि देहाकृति विठ्ठलाची ॥ ३ ॥
विठ्ठलासी तया नाहीं भेदभाव ।
ऐसे माझें मन साक्ष आहे ॥ ४ ॥
पांडुरंग तुका पांडुरंग तुका ।
वेगळीक देखा होय केवीं ॥ ५ ॥
कलियुगीं बौद्धरूप धरी हरी ।
तुकोबा शरीरीं प्रवेशला ॥ ६ ॥
तुकोबाची बुद्धि पांडुरंग रूप ।
मन तें स्वरूप तुकोबाचें ॥ ७ ॥
तुकोबाचे सर्व इंद्रियचालक ।
पांडुरंग देख सत्य आहे ॥ ८ ॥
तुकोबाचे नेत्र तेही पांडुरंग ।
श्रोतृ ते अभंगरूप त्याचे ॥ ९ ॥
तुकोबाचे हात लिहिताती जें जें ।
तेंचि तें सहजें पांडुरंग ॥ १० ॥
सर्वही व्यापार तुकोबाचे हरी ।
आपणचि करी अद्वयत्वें ॥ ११ ॥
बहिणी म्हणे रूपें व्यापक ‘तुका’ वा ।
ध्यान माझ्या जीवा हेंचि पाहे ॥ १२ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जालें समाधान ब्राह्मणाच्या शब्दें – संत बहिणाबाई अभंग

1 thought on “जालें समाधान ब्राह्मणाच्या शब्दें – संत बहिणाबाई अभंग”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *