vardhaman mahavir information marathi
वर्धमान महावीर (इ.स.पू ५९९-इ.स.पू ५२७) हे जैन धर्माचे २४ वे व शेवटचे तीर्थंकर होते. महावीराचे मूळ नांव वर्धमान होते. त्यांच्या जन्माच्या वेळी सर्वत्र बहर आला, फळं, फुलांनी लगडलेली झाडे पाहून राज पुरोहितांनी त्यांचे नाव वर्धमान ठेवले.त्यांचा जन्म बिहार राज्यातील कुंडग्रामया वैशालीच्या उपनगरात झाला. त्यांच्या वडिलांचे नांव सिद्धार्थ तर आईचे नांव त्रिशला होते. महावीराच्या जन्मासंबंधीच्या अनेक आख्यायिका जैन धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. कल्पनासूत्र नावाच्या ग्रंथात वर्धमानाच्या जन्मोत्सवाची व त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आहे.वर्धमान याचे बालपण चागंले गेले.(vardhaman mahavir)
महावीराची विचारधारा ही चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यास अधिक काळ आकर्षित करू शकले नाही. संसाराचे आकर्षण त्याच्या मनात निर्माण होऊ शकले नाही. त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तर तो अधिक विरक्त झाले. ऐहिक सुखाबद्दल त्याच्या मनात उरलेसुरले जे आकर्षण होते तेही कमी झाले. मानवी जीवनातील दु:ख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्यांना झाली. दु:ख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्यांना वाटायचे. आपले वडीलबंधू नंदीवर्धन यांची परवानगी घेऊन त्यांनी गृहत्याग केला. महावीरांनी जंगलात बारा वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.(vardhaman mahavir)
भारतात निर्माण झालेल्या आध्यात्मिक विचाराला सनातन धर्म वा हिंदू धर्म म्हटले जाते. वैदिक, बौद्ध, जैन, सिख असे अनेक पंथ उपपंथीयांनी या आध्यात्मिक विचाराला समृद्ध केले. दु:खातून मुक्ति वा निर्वाणासाठी अनेक विधी दिले. यात विशेष क्रांतीकारक चेतना अवतरीत झाल्या ज्यांनी या अध्यात्मगंगेला लोकहृदयात त्या त्या काळातील भाषेत प्रतिष्ठीत केले. अशांपैकी एक महान चेतना म्हणजे भगवान महावीर !(vardhaman mahavir)
कोण्या एका काळात एका पित्याचे दोन पुत्र, त्यातला एक राष्ट्ररक्षणासाठी हत्यार चालवणारा क्षत्रिय होत असे व दुसरा वेदमंत्र जाणणारा ब्राह्मण. तसेच दु:खमुक्त करणारे विधी व पंथ (मार्ग) वेगवेगळे होते पण व्यक्तिला त्याचे अंतीम सत्य दाखवणारा, सनातनत्वाचे भान देणारा, पुनर्जन्म-पूर्वजन्म सिद्धांत मानणारा, उपासनेत ओंकाराची अनुभूति येणारा, कर्म सिद्धांत स्वीकारणारा म्हणून एकच सनातन धर्म होता. सनपूर्व 15 व्या शतकात कुरुपांचालांच्या भूमीत ब्राह्मण, क्षत्रिय भेद पडला.(vardhaman mahavir)
भगवान श्रीकृष्णांचे (जे जैनांच्या पुढच्या कल्पात पहिले तीर्थंकर असतील) चुलतभाऊ घोर अंगिरस (यदुकुळातील श्रेष्ठ पुरुष दशार्ह-अग्रज समुद्रविजय यांची राणी शिवादेवी यांच्या पोटी श्रावण शुक्ल पंचमीला जन्म) ज्यांनी मुक्तिसाठी अहिंसावादी जैन पंथ स्वीकारला व केवलज्ञान प्राप्त करुन भगवान नेमीनाथ या नावाने 22 वे तीर्थंकर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या निमित्ताने यादवकुळात ब्राह्मण व श्रमण परंपरेचा मेळ साधला गेला असं म्हटलं तर वावगं ठरु नये. त्यांच्या नंतर जैन परंपरेत पुढे सनपूर्व 599-527 दरम्यान 24 वे तीर्थंकर म्हणून भगवान वर्धमान महावीर झाले. ज्यांची अश्विन आमावस्या ही तिथी (दिवाळीचा लक्ष्मीपुजनाचा दिवस) निर्वाण दिन म्हणुन ओळखली जाते.(vardhaman mahavir)
बिहार राज्यातील वैशालीच्या जवळील कुंडग्रामी (वसाढ) क्षत्रिय कुळातील पिता सिद्धार्थ व माता त्रिशला यांच्या पोटी चैत्र शुद्ध त्रयोदशीला जन्म झाला. वैशाली हे मोठे गणराज्य होते. मगध, कोसल, वत्स व अवंती या विशाल गणराज्याच्या बरोबरीने त्याचा उल्लेख होतो. आईवडिलांनी वर्धमान नाव ठेवले तरी वीरवृत्तीमुळे ते महावीर म्हणून प्रसिद्ध पावले. इंद्र त्यांच्या दर्शनाला आला होता त्याने त्यांचे दर्शन घेताच त्यांना वीर असे संबोधले. तर चारणमुनींनी सन्मती असे संबोधले. संगमदेवाने त्यांना महावीर असे नाव ठेवले. ज्ञातृपुत्र असेही एक नाव त्यांना आहे.(vardhaman mahavir)
वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. ऋजुकूला नदीच्या किनारी जृंभक गावी बारा वर्षे कठोर तप करुन केवल ज्ञान त्यांना मिळाले. नंतर 66 दिवस मगध देशातल्या राजगृहाजवळ विपुलाचल पर्वतावर मौन धरुन त्यांनी विहार केला. तिथेच इंद्रभूती या ब्राह्मणाच्या शंका दूर करुन त्याला पहिला गणधर बनवले. याशिवाय त्यांचे अनेक मुख्य गणधर ब्राह्मणच होते. त्यांचा ब्राह्मणधर्माला जातीप्रथा व अनावश्यक क्रियाकांड सोडता विरोध नव्हता. भगवान बुद्धांच्या समकालीन असणार्या भगवान महावीरांनी मद्य, मांस, मदिरा, हिंसा, असत्यवचन, मध, चोरी करणं यांना टाळून पत्नीशिवाय इतर स्त्रियांना माता मानणं व आवश्यक तेवढ्या धनाचा संग्रह सांगितला.(vardhaman mahavir)
व्यक्तिचे श्रेष्ठत्व त्याच्या कर्मावर ठरते, जन्मावर नाही असा स्पष्टपणा त्यांच्या उपदेशात होता. क्षत्रिय कुळातला जन्म असुनही ‘मी एक श्रेष्ठ ब्राह्मण आहे’ असे ते म्हणत. अध:पतित पुरोहित व त्यांचे अनावश्यक जटिल क्रियाकांड यांना विरोध करत स्त्री, पुरुष व सर्व वर्ण यांना निर्वाणाचा समान अधिकार आहे असे ते म्हणाले.(vardhaman mahavir)
य: शस्त्रवृत्ति: समरे रिपु: स्याद् य: कण्टको वा निजमण्डलस्य । अस्त्राणि तत्रैव नृपा: क्षिपन्ति न दीनकानीनशुभाशयेषु॥ अर्थात जो शस्त्रधारण करुन रणांगणात युद्ध करण्यासाठी आला असेल अथवा जो आपल्या देशाला बाधक ठरत असेल अशावरच राजांनी शस्त्र उचलावे. दीन, दु:खी व सद्विचारी पुरुषांवर त्याने शस्त्र उचलु नये. याचाच अर्थ योग्य ठिकाणी वापरलेली हिंसा ही योग्यच आहे हे स्पष्ट केले.(vardhaman mahavir)
अर्धमागधी भाषेतील भगवतीसूत्र या ग्रंथाच्या माध्यमातून गुरुशिष्य संवादाने साधकांच्या अनेक शंका ते सोडवतात. साधनेद्वारा संकुचितता सोडून सर्वसंग्राहक पातळी कशी येते याचे प्रत्यंतर त्यांच्या अनेकांतवाद वा स्यादवाद विचारात दिसते. कुठल्याही गोष्टीचा सर्व बाजुंनी विचार करण्याचा संकेत येथे अभिप्रेत आहे. वेगळा विचार करणार्या प्रतिपक्षाबद्दल समंजसपणा दाखवण्याचे मानसिक धैर्य अभिप्रेत आहे. स्याद्वादाने येणारे सम्यगज्ञान व अहिंसेने येणारे सम्यगदर्शन या दोघांचा परिपाक सम्यक चारित्र्यात झाला पाहिजे, जो तो आपापल्या कर्म फळांना जबाबदार आहे म्हणून मोक्षासाठी क्रियाक्षय करावा व ज्याचा त्याने स्वत:चा उद्धार स्वत: करुन घ्यावा, कोणी परमेश्वर तो देणार नाही असे त्यांनी सांगितले.(vardhaman mahavir)
मोक्षाचे अधिकारी कोण ? अहिंसा, कर्म इ. उपदेश बघता भगवान श्रीकृष्णांच्या गीतेतील क्रांतिकारी विचारांची आठवण येते. केवलज्ञानानंतर 42 वर्षे त्यांनी श्रमणपंथाची संघटना व प्रसाराचे कार्य केले व 72 व्या वर्षी आश्विन आमावस्येला मोक्षाला गेले.(vardhaman mahavir)
सो जयइ जस्स केवलणाणुज्जलदप्पणम्मि लोयालोयं । पुढ पदिबिंब दीसइ वियसिय सयवत्तगब्भगउरो वीरो ॥- ज्याच्या केवलज्ञानरुपी उज्ज्वल दर्पणात लोक आणि अलोक प्रतिबींबासारखे विशद रुपाने दिसतात आणि जो विकसित कमलाच्या परागाप्रमाणे सुवर्णकांतीने झळकतो, अशा भगवान महावीराचा जयजयकार असो !(vardhaman mahavir)
महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. मोठया संख्येने जैन श्रद्धाळू हा सण साजरा करतात. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.
मातंग समाजाला फार प्राचीन इतिहास आहे., पण त्यांच्या इतिहासावर फारसे संशोधन झालेले नाही. जे झाले आहे ते बौद्ध साहित्यावर आधारीत आहे. अर्थातच, मातंगांचा इतिहास लिहिताना जैन साहित्यातील मातंगांची माहिती फारशी कोणी विचारात घेतली नाही. जैन साहित्यात मातंगांचे उल्लेख वारंवार येतात. त्यांचा संबध सरळ सरळ जैन धर्माचे पहिले तीर्थंकर रिषभ उर्फ आदिनाथ यांच्यापर्यंत जातो. अर्थातच हा संबंध इतिहासपूर्व काळातील आहे. रिषभ हे मानवी संस्कृतीचे निर्माते होते. त्यांनी मानवाला शेती, शस्त्रविद्या, लिखाण आणि उपजीविकेचे अनेक उद्योग शिकवले. जैन साहित्य आणि पुराण साहित्य या दोन्हींत रिषभांना एकमुखाने सर्व क्षत्रियांचे पूर्वज आणि सर्व क्षत्रियांकडून पूजित मानले आहे.
या रिषभांना नमी आणि विनमी असे दोन नातू होते. विनमीला मातंग नावाचा मुलगा होता. त्याच्यापासून मातंग वंशाची सुरवात झाली. मातंगवंशीयांना वेगवेगळ्या विद्या अवगत होत्या, म्हणून त्यांना विद्याधर असेही म्हंटले जाई. पुढे मातंग वंशाच्या सात शाखा झाल्या. त्यातील एक शाखा म्हणजे वार्क्ष मुलिक वंश होय. या वार्क्ष मुलिक वंशाची खूण सापाचे चिन्ह असलेले दागिने ही होती. हाच वंश पुढे नागवंश म्हणून ओळखला जावू लागला. या वार्क्ष मूलक उर्फ नाग वंशात पुढे जैन धर्माचे सातवे तीर्थंकर सुपार्श्वनाथ हे झाले. जैन परंपरेत सर्व चोवीस तीर्थंकरांना वेगवेगळी चिन्हे आहेत. यातील अपवाद वगळता बहुतेक चिन्हे ही प्राण्यांची आहेत. सुपार्श्वनाथांचे चिन्ह स्वस्तिक हे आहे, पण त्याचबरोबर त्यांचे दुसरे चिन्ह फणाधारी साप हे आहे. यातील स्वस्तिक हे चिन्ह सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे, तर फणाधारी साप हे चिन्ह नागवंशाशी संबंधीत आहे.
विशेष म्हणजे सुपार्श्वनाथ यांचा यक्ष मातंग आहे, त्याच प्रमाणे जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर महावीर यांचा यक्षही मातंग आहे. अर्थातच मातंग वंशाची सुरवात ज्याच्यापासून झाली तो विनमी पुत्र मातंग, सुपार्श्वनाथ यांचा यक्ष मातंग आणि महावीर यांचा यक्ष मातंग असे एकूण तीन महान मातंग जैन परंपरेत होवून गेले.
जैन धर्मात मुनी परंपरेला फार महत्व आहे. जैन साहित्यात प्राचीन काळातील अनेक जैन मुनींची माहिती अगदी त्यांचा जन्म कोणत्या कुळात अथवा समाजात झाला यासह येते. या संदर्भात अभ्यास केल्यावर असे दिसून येते की आज जशी जैन मुनी दीक्षा घ्यायची मुभा कोणत्याही जातीच्या व्यक्तीला आहे, तशीच ती प्राचीन काळीही होती. जैन साहित्यातील उल्लेखानुसार सगळ्या वर्णांचे आणि त्या काळातील कोणत्याही वंशाचे समाजाचे लोक जैन मुनीदीक्षा घेत असत. मातंग लोकही याला अपवाद नव्हते. मातंग व्यक्तीने जैन मुनी दीक्षा घेतल्याची व पुढे अगदी ‘आचार्य’ झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. हरीकेशी, चित्त, संभूत, मेतार्य ही त्यांच्यापैकी कांही नावे.
यातील चित्त आणि संभूत हे दोघे भाऊ होते. त्यांची माहिती उत्तराध्ययन सूत्र या प्राचीन जैन ग्रंथात येते. मातंग समाजात जन्मलेले हे दोघे भाऊ जैन मुनी झाल्यावर एका यज्ञाच्या ठिकाणी जातात आणि त्या याज्ञिक ब्राम्हणांना यज्ञ करणे, त्यात बळी देणे कसे चुकीचे आहे सांगतात. त्यांचे म्हणणे पटून ते ब्राम्हण यज्ञ-याग वगैरे सोडून देतात आणि महावीरांचे शिष्य बनतात, अशा स्वरूपाची एक सविस्तर कथा या ग्रंथात आली आहे. याज्ञिक ब्राम्हणांना मातंग मुनींनी उपदेश करणे आणि त्यांचे मतपरिवर्तन करणे ही क्रांतीकारक घटना वाटते. उत्तराध्ययन सूत्र हा ग्रंथ फार महत्वाचा आहे, कारण तो प्राचीन तर आहेच, पण त्याच बरोबर यात वर्धमान महावीर यांच्या आयुष्यातील शेवटच्या काळातील उपदेशांचे सार आहे.
वाल्मिकी रामायणात हनुमान, वाली, सुग्रीव, नल, नील, अंगद यांना वानर, अस्वल वगैरे मानले आहे. कांही ठिकाणी ते मातंग होते असेही म्हंटले आहे. पण जैन रामायणात त्यांना विद्याधर आणि मानवच मानले आहे. ते मानव असले तरी त्यांचे पूर्वज ज्या बेटावर रहात तेथे मोठ्या प्रमाणात वानर होते, त्यामुळे या विद्याधरांनी आपल्या ध्वजावर वानर हे चिन्ह वापरण्यास सुरवात केली असे स्पष्टीकरण जैन रामायण देते. मातंगाना विविध विद्या अवगत असल्याने त्यांना विद्याधर म्हणून ओळखले जात असे हे मी या लेखाच्या सुरवातीस म्हंटलेच आहे.
वाल्मिकी रामायणात हनुमानाला रामाचा दास दाखवले आहे, याउलट जैन रामायणात हनुमान हा विद्याधर आणि राजा असल्याचे आणि रामाचा मदतकर्ता मित्र असल्याचे दाखवले आहे. जैन धर्म मोक्ष मानतो. मोक्ष हा केवळ मानवासच मिळतो असे जैन तत्वज्ञान सांगते. जैन धर्मात हनुमान, सुग्रीव, नल, नील वगैरे मोक्षास गेले असे मानले आहे. यावरूनही ते मानवच होते असे दिसते. मातंग वंश आणि जैन धर्म या विषयावर मी येथे थोडक्यात माहिती दिली आहे. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, आणि ते मुख्य करून मातंग संशोधकांनी केले पाहिजे असे मला वाटते.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या