लेख

taal – टाळ

taal information marathi

पंढरीत हा परंपरागत असलेला पितळी वस्तू बनवण्याचा व्यवसाय ओतारी समाज गेली अनेक वर्षे करीत आहे. यामध्ये मूर्ती, टाळ, घंटा, पंचपळी, पात्र, समई, दिवे तयार करण्यात ओतारी समाजासह अनेकांनी आजही हा व्यवसाय जपला आहे. यामुळे पंढरीत तयार होणारा हा पितळीटाळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात घुमतो आहे.

पंढरी हे वारकरी संप्रदायाचे माहेरघर आहे. वारकरी संप्रदायात टाळ, मृदंग, विणा, पखवाज, तबला या पारंपारिक वाद्यांना मोठे महत्त्व असून त्यांना वर्षभर चांगली मागणी असते. त्यामुळे पंढरपूर शहरात या वाद्यांची निर्मीती आणि विक्रीचा व्यवसाय चांगलाच रूजलेला आहे. पंढरीमध्ये ज्याप्रमाणे पखवाज, वीणा, मूर्त्या बनवितात त्याप्रमाणे टाळ बनवण्याचा व्यवसाय प्राचीन काळापासून आजपर्यंत चालू आहे.

परंपरागत पद्धतीने, वारस्याने हा व्यवसाय ओतारी समाज करत आहे. पंढरपूरमध्ये सध्या जवळपास ८ ते  १० छोटे पितळी वस्तू बनवणारे कारखाने आहेत. एका कारखान्यात किमान ४ ते ५  कारागीर असतात. त्यामध्ये एक भट्टीमध्ये  तीन प्रकारच्या धातूचे द्रव तयार करतो तर दुसरा मोल्डिंग आणि तिसरा तयार वस्तूचे रेखीव घासकाम  करतो.

यानंतर चौथ्याकडे पॉलीश करण्यासाठी देतो. टाळ(taal) तयार करण्यासाठी भटूर, जस्त, कास, या तिन्ही धातूंना भात्याच्या साहय्याने भट्टीमध्ये तापवून द्रव तयार करतात . त्यामध्ये टाकणखार, संजिरा पावडर ही वापरतात मेणकाम डांबर मातीच्या साच्यामध्ये हे तप्त द्रव ओतून टाळ(taal) बनविले जातात. पितळे प्रमाणे कांस्याचेही टाळ असतात. उत्तम प्रकारचा  नाद देण्यासाठी काशाचे टाळ उत्तम समजले जातात. वारकरी संप्रदायात टाळास अतिशय महत्वाचे स्थान असल्यामुळे येथील टाळ तयार करण्याचा पारंपारिक व्यवसाय अधुनिक युगातही टिकून आहे.


टाळ निर्मितीस आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज – (taal information marathi)

दिवसभरात चार कारागीर साधारण २५ किलोचे काम करतात. सकाळ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत काम केल्यास ४०० ते ५०० रूपये मजुरी मिळते. एक जोड ३०० ग्रॅम,  ४०० ते ५०० ग्रॅम पयर्ंत असतो तर किंमत ५०० ते ९०० पर्यत असते. पूर्ण महाराष्ट्रात हे पोहचवणारा पंढरीतील ओतारी समाज मात्र कमी मजुरीमध्ये वर्षानुवर्षे काम करीत आहे. या हस्तकलेला औद्योगिकरणाच्या माध्यमातून अधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज व्यक्त होत आहे. 

वारकरी सांप्रदायामध्ये भजन, कीर्तन जितके अनादी आहेत, तितकेच मृदुंग, चिपळ्या व टाळही वाद्ये. वारकरी म्हणाला की आपल्या डोळ्यासमोर टाळघेतलेली व्यक्ती समोर उभी राहते. टाळाशिवाय अभंग अपूर्णच आहे. म्हणून टाळावर अनेक अभंग ही आहे . टाळाचा( taal) परिचय करताना टाळहे एक घनवाद्य म्हणून संबोधले जाते. ज्या दोन वस्तूंचा एकमेकांशी आघात करून अप्लकालीन नाद उत्पन्न होतो तो म्हणजेटाळ.

वारकरी संप्रदायातील वाद्यातून निघणारा हा गजर काळजाला भिडतो


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: thinkmaharashtra.com

taal information marathi

View Comments

  • नमस्कार ? रामकृष्णहरि!
    आपण संत साहित्य या द्वारे अतिउत्तम माहिती संपूर्ण महाराष्ट्राला देत आहेत. त्याबद्दल मी आपले आभार मानतो.

    आपल्या PDF Download स्वरुपात उपलब्ध होतील का?

    • धन्यवाद महाराज

      pdf सध्या उपलब्ध नाही लवकरच टाकण्याचा प्रयत्न करू

  • Kupach sundar anamol mahiti juni parampara jopasun sangitale Gajara Farm kadun satasha abahar
    Ram Krishna Hari
    Mouli

  • राम कृष्ण हरी महाराज
    तुम्ही खुप चागले काम केला आहे अशी माहिती रोज पुरावता तुमचे खूप खुप आभार

  • Khoop chan mahiti aapan post karat ahat.dhanyawad...aapan Pakhawaj ya vadyachi mahiti post Karu shakta ka?

  • टाळ बनवणाऱ्या बालकांचा नंबर मिळेल का?

  • राम कृष्ण हरी
    अती सुंदर माहिती दिला,अजुन पर्यंत अशी माहिती कोणीही दिली नाही.माऊली ??