मोहंमद पैगंबर
मुस्लिम धर्माचे संस्थापक व प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्म वीस एप्रिल ५७१ मध्ये मक्का (सध्या सौदी अरेबियात) या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हजरत अब्दुल्लाह आणि आईचे नाव हजरत आमेना होते.
संत मोहम्मद या शब्दाचा इस्लाम मधील अर्थ आदरणीय असा होतो. मोहम्मद पैगंबर अवघ्या सहा वषाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. पुढे त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. मोहम्मद पैगंबर मोठे झाल्यानंतर व्यापारात पडले.
व्यापारी म्हणून त्यांनी चांगला नावलौकीक कमावला. पुढे त्यांनी मक्केतील एका विधवेशी लग्न केले. त्यावेळी त्यांचे वय सव्वीस होते.
त्यांना आस लागली होती ती आत्मिक सुखाची. त्याचा शोध घेण्यासाठीच ते जवळच्याच गुहेत गेले. तेथे ध्यानधारणा करून त्यांनी आपल्या मनाचा तळ गाठला.
गुहेतील हे वास्तव्य साक्षात्कारास कारणीभूत ठरले. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना इश्वरी साक्षात्काराचा पहिला अनुभव आला आणि त्यांचे अवघे जीवनच बदलून गेले. साक्षात्कारा नंतर तीन वर्षांनी त्यांनी प्रवचने द्यायला सुरवात केली.
जगात देव एकच आहे आणि त्याला पूर्णपणे शऱण जा हा संदेश त्यांनी दिला. आपण ईश्वराचे प्रेषित असून आदम, नोहा, मोझेस, डेव्हीड, येशू याच परंपरेतील आपण आहोत, असे सांगायला सुरवात केली.
त्यांच्या प्रवचनांचा लोकांवर प्रभाव पडू लागला. त्यांचा शिष्यवगर्ही हळूहळू तयार होऊ लागला. पण मक्केतील काही टोळ्यांना त्यांचा संदेश मान्य नव्हता. त्यांनी पैगंबरांना त्रास द्यायला सुरवात केली.
अखेरीस पैगंबरांनी त्यांच्या शिष्यांना घेऊन जवळच्याच मदिनेला स्थलांतर केले. ही घटना घडली ती इसवी सन ६२२ मध्ये. मुस्लिमांमध्ये या वर्षाला मोठे महत्त्व आहे. कारण या वषार्पासून त्यांचे नववर्ष (हिजरा) सुरू होते.
मदिनेला गेल्यानंतर पैगंबरांनी तेथील टोळ्यांना एकत्रित करायला सुरवात केली. त्यांच्यात आपली शिकवण रूजवली. त्यामुळे तेथे त्यांना मोठा शिष्यवर्ग मिळाला. पुढे या टोळ्यांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने त्यांनी इसवी सन ६३२ मध्ये मदिनेचा ताबा घेतला.
त्यांनी परिसराची तीथर्यात्रा करून आपला संदेश दिला. नंतर मदिनेत परतल्यानंतर श्रमाने ते आजारी प़डले. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधना पर्यंत मात्र जवळपास सर्व अरेबिया मुस्लिम झाला होता.
पैगंबरांना सातत्याने अगदी त्यांच्या मत्यूपर्यंत साक्षात्कार होत होते. या साक्षात्कारी संदेशांचा मिळूनच मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण तयार झाला आहे.
पैगंबरांना नबी म्हणजे प्रेषित आणि रसूल म्हणजे देवदूत असेही म्हटले जाते. कुराणात तर त्यांचा उल्लेख अहमद म्हणजे अधिक आदरणीय असा केला आहे.