श्री व्यंकटेश आरती
शेषाचल अवतार तारक तूं देवा ।
सुरवरमुनिवर भावें करिती जन सेवा ।।
कमळारमणा अससी अगणित गुण ठेवा ।
कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥१॥
जय देव जय देव जय व्यंकटेशा ।
केवळ करुणासिंधू पुरवीसी आशा ।। धृ ।।
हें निजवैकुंठ म्हणुनि ध्यातों मी तूतें ।
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते ।।
देखुनि तुझें स्वरूप सुख अद्भुत होतें।
ध्यातों तुजला श्रीपति दृढ मानस होतें ॥ जय ॥ २॥