सत्यनारायण आरती

सत्यनारायण आरती

सत्यनारायण आरती


जय जय दीनदयाळ त्यनारायण देवा ।
पंचारति ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा ।। धृ ।।

विधियुक्त पूजुनी रिती पुराण श्रवण
परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ।।
घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण प्रसाद
भक्षण करितां प्रसन्न तूं नारायण ॥ जय ॥ १ ॥

शतानंद विप्रें पूर्वी व्रत है आचरिलें ।
दरिद्र दवडुनि अंर्ती त्यातें मोक्षपदा नेलें ।
त्यापासुनि हें व्रत या कलियुगि सकळां श्रुत झालें
भावार्थे पूजितां सर्वा इच्छित लाधलें ॥ जय || २ ||

साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ।
इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ।।
त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगिलें ।
स्मृति होऊनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्धरिलें ॥ जय ।। ३ ।।

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ।
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ।।
अंगध्वजरायाची यापरि दुःखस्थिति आली ।
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसली ॥ जय ॥ ४ ॥

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ।
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ।।
अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ।
ऐसा भक्तां संकटिं पावसि तूं चक्रपाणी ॥ जय ॥ ५॥

अनन्यभावें पूजुनि हें व्रत जे जन आचरति ।
इच्छित पुरविसी त्यांतें देउनि संतति संपत्ती ।।
संहरती भवदुरितें सर्वहि बन्धनें तुटती।
राजा रंका समान मानुनि पावसी श्रीपती ॥ जय ॥ ६ ॥

ऐसा तब व्रतमहिमा अपार वर्णू मी कैसा ।
भक्तिपुरस्सर आचरती त्यां पावसि जगदीशा ।।
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ।
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ।। जय ।। ७ ।।


सत्यनारायण आरती समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *