आरती

संत सेना महाराजांची आरती

संत सेना महाराजांची आरती १ विडिओ सहित

जय जयाजी महाराजा श्री सद्गुरु सेना ।
आरती करितो भावे कर जोडुनी नमना ।।१।।
असता वैकुंठासी स्वये सागती हृषीकेशी ।
जन्मूनी नाभिक वंशी उद्धरी सकळजना ।।२।।
रामानंदाच्या प्रसादे पूजा करी नित्य धरुनिया नेमा ।
तुझियासाठी तुझे रूप घेई श्री पंढरीराणा ।।३।।
राम अवतारी गृहकरुये नावाडी जाण ।
कृष्णवतारी भीष्म स्वयें प्रत्यक्ष श्री सेना ।।४।।
श्रावण वध द्वादशीसी भजन कीर्तना ।
करुनि मध्यानासी गेले वैकुंठी श्री सेना ।।५।।
राजाराम हरी अनन्यभावे लोटांगण ।
घाली प्रेमे आरती करितसे नमना ।।६।।

संत सेना महाराजांची आरती

आरती ही सेना । शुद्ध करूनि मना ।
ओवाळू आरती । मज उद्धरी दीना ।१||
भक्ताचे संकटी । धावलासे जगजेठी ।
सेना रूप धरियेले । पतित पावना ||२||
आरती ही सेना । शुद्ध करूनि मना ।
ओवाळू आरती । मज उद्धरी दीना ।।१।|
लोह परिसाचे संगती । सुवर्ण होती ।
दावी संत महिमा । विश्वंभरचरणा ।। ३ ।।



https://www.krushikranti.com/