निरोप आरती
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा । वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ॥ धृ ।।
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों। देवा तुजलाची ध्यातों । प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों ॥ १ ॥
तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना देवा हेची वासना । रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥ २॥
मागणें तें देवा आतां एकची आहे। आतां एकची आहे। तरुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहें ।। ३।।
जेव्हां सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया। ऐशा या ठाया प्रेमानंदें लागू तुझी कीर्ती गावया ॥ ४॥
सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनीं । आमुच्या मनीं । हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥ ५॥
वारुनियां संकटें आतां आमुर्ची सारी। आतां आमुची सारी । कृपेची साउली देवा दीनावरि करी ॥ ६॥
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी चिंता तुम्हा असावी । सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ।।७।।
निरोप घेतों आतां आम्हां आज्ञा असावी चुकले आमुचें कांही त्याची क्षमा असावी ।।