Categories: आरती

नीरांजन आरती

नीरांजन आरती


पंचप्राणांचें नीरांजन रुनी । वाती परिपूर्ण भरुनी ।।

मोहममतेनें मूळ भिजवोनी । अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनी ।। १ ।।

जय देव जय देव जय नीरांजना । नीरांजन ओवाळूं तुझिया समचरणा ।। धृ ।।

ज्वाला ना काजळी दिवस न राती । सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ।।

पूर्णानंदें धालों बोलों मी किती । उजळों हे शिवराम भावें ओंवाळीती ॥ २॥ ॥ धृ ।।


नीरांजन आरती समाप्त .