नीरांजन आरती
पंचप्राणांचें नीरांजन करुनी । वाती परिपूर्ण भरुनी ।।
मोहममतेनें समूळ भिजवोनी । अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनी ।। १ ।।
जय देव जय देव जय नीरांजना । नीरांजन ओवाळूं तुझिया समचरणा ।। धृ ।।
ज्वाला ना काजळी दिवस न राती । सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ।।
पूर्णानंदें धालों बोलों मी किती । उजळों हे शिवराम भावें ओंवाळीती ॥ २॥ ॥ धृ ।।