Categories: आरती

नैवेद्य आरती

नैवेद्य आरती


जय देव जय देव जय विठाबाई । पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायीं ।। धृ ।।

षड्रपक्वान्नें हीं अर्पित तुज माई । कृपा करुनी तीं तूं मान्य रुनि घेई ।।

तृप्ती सर्व जीवां जेवितां तूं आई। जीवन सर्वांचें हें असे तव पायीं ।। १ ।।

आनंदें भोजन करावें आतां । यथेच्छ जेवूनी उच्छिष्ट उरतां ।।

प्रसाद तो देई आपुल्या भक्ता । हेंचि मागें ठेवूनि तव चरणीं माथा || २ ||


नैवेद्य आरती समाप्त .