आरती

संत मुक्ताबाई आरती

संत मुक्ताबाई आरती

जयदेवी  जयदेवी जय मुक्ताबाई ।।
आदिमाते जननी वादन तवपाई ।।धृ.।।

ब्रह्मा, विष्णू , शिव रूपसी आले ।
निवृती सोपान ज्ञान प्रगटले ।
भगीनी मुक्ताई ब्रह्म चित्कले ।
अवतार धरुनी जग उद्धरीले ।। १ ।।

तापी तटाकवासी श्री चांगदेव ।
ज्ञान बोधुनी त्यासी दिधले वैभव ।
योग्याची ती उर्मी निरसोनी सर्व ।
माया मिथ्था दावी नित्य स्वंयमेव ।। २ ।।

निरंजनी विज कडाडली पाही ।
मनुजेचे तिरी अदृश्य होई ।
जलधारा स्वरूपे वाहे तव ठायी ।
तेथे अधिष्ठान झाली मुक्ताबाई ।। ३ ।।

हे पण वाचा: संत मुक्ताबाई संपूर्ण माहिती



तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: weebly 

संत मुक्ताबाई आरती

View Comments

  • सदर आरतीत आपण चुक केली असुन शेवटच्या चरणात आपण.तेथे अधिष्ठान (तुका म्हणे आता उदार तुं होई ।।
    मज ठेवीं पायी संताचिया) हे आपल मनाच टाकल आहे. त्या जागी आपण असे लिहा (तेथे अधिष्ठान झाली मुक्ताबाई) हे खर मुक्ताईच्या आरतीचे शेवटचे चरण आहे.या मुळे आपण ही चुक लवकर सुधरवा अशी अपेक्षा आहे.

    • चूक लक्षात घेऊन आम्ही यात बदल केला आहे