आरती

संत तुकाविप्र कृष्णानदीची आरती

संत तुकाविप्र कृष्णानदीची आरती

और कोटी तीर्था । वद्य तू जननी ||
पवन स्पर्शे जडमूढ | पावन तुझेनी ||
जलरुपी अवतार । हरीहरा वनी ॥
कलीयुगी हे वस्ती | तुझ्या कृपेनी ॥

जयदेवी जयदेवी । जय श्री कृष्णे माते ॥
ओवाळू आरती। हरीहर सुख सरीते ||
|| जयदेवी जयदेवी ||१||

स्मरणमात्रे पावन । करीसी तू सकळा ॥
अनंत नामे तुझी अनंतशा लीला ॥
तुझेनी योगे। पापे होती धुरळा ॥
म्हणोनि माझी वाणी। हीन दीन उद्धरा ॥

जयदेवी जयदेवी । जय श्री कृष्णे माते ॥
ओवाळू आरती। हरीहर सुख सरीते ॥
|| जयदेवी जयदेवी ||२||

श्री कृष्णे माऊली। हे तुजला विनती ॥
हीन दीन सुख हे माझे। राहो तव चित्ती ॥
विश्वास नेमे । दे क्षमा शांती ॥
तुकाविप्र कृपा करावी पूर्ती ॥

जयदेवी जयदेवी । जय श्री कृष्णे माते ॥
ओवाळू आरती। हरीहर सुख सरीते ॥
॥जयदेवी जयदेवी ||३||

संत तुकाविप्र कृष्णानदीची आरती समाप्त


हे पण वाचा: संत तुकाविप्र संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: marathiworld