देवीच्या आरत्या

देवीच्या आरत्या

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ची आरती:-
जय देवी तुळजाअंबाई
चंडमुंड वधुनिया
महिषासुर वधुनिया
हे विलासी तुझे पाई
वाघावर स्वार झाली
हाती सोन्याचे गोठ
बाजूबंध दंडा मधे
जय देवी तुळजाअंबाई
आई तुझ्या दरबारी
लाखखंडी भर तेल
जयसे कोड़ी मधे
जय देवी तुळजाअंबाई
कवडयांचे गड़ी माड़
करिते भक्तांचा सांभाड
तुडजापुरची माता भवानी
जय देवी तुळजाअंबाई
जय देवी तुळजाअंबाई
चंडमुंड वधुनिया
महिषासुर वधुनिया
हे विलासी तुझे पाई

आरती महालक्ष्मीची

जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता ।

प्रसन्न होऊनिया वर देई आता ॥ धृ ।।

विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता ॥ १ ॥

विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही ।

धावसी आम्हालागी पावसी लवलाही ॥ २॥

त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभे सुखशांती ।

सर्व सर्वही दुःख सर्व ती पळती ॥ ३ ॥

वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे देसि दान वरदे सदैव सौख्याचे ।। ४ ।।

यास्तव अगस्ती बन्धु आरती ओवाळी ।

प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली ॥ ५॥


आरती रेणुकामाता :-

जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती।
वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
भाग्यवती तूं जननी, परशुरामाची।
तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी।
तुझीच नाना नावें नाना अवतारी॥३॥

आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
जगदेश्वरी जगदंबे, व्यापिसी विश्वाला।
मिलिंद माधव भावे वंदितसे तुजला॥४॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥


श्री दुर्गादेवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।।

जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।।
जय देवी जय देवी ।। धृ० ।।

त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।। २ ।।

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।।

– समर्थ रामदास स्वामी

अर्थ : श्री दुर्गादेवीच्या आरतीमधील काही कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊया. शब्दार्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते. १. ‘वारी वारी जन्ममरणाते वारी’ यामधील ‘वारी’ या शब्दाचा अर्थ आहे ‘सोडव’ २. ‘चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही ।’ या ओळीचा अर्थ आहे की, देवीच्या स्वरूपाचे वर्णन करतांना चारही वेद थकले आणि सहा दर्शनेसुद्धा या विवादाच्या प्रवाहात वाहून गेली, म्हणजे त्यांनाही वर्णन करणे शक्य झाले नाही. अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो, अशी देवीच्या चरणी प्रार्थना आहे.


श्री संतोषीमातेची आरती

जय देवी श्री देवी संतोषी माते ।

वंदन भावें माझें तव पदकमलातें ॥ धृ ॥

श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णूपत्नी

पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नीं ।।

जननी विश्वाची तूं जीवन चिच्छक्ती

शरण तुला मी आलों नुरवी आपत्ती ।। १ ।। भृगुवारी श्रद्धेनें उपास तव करिती ।

आंबट कोणी काही अन्न न सेवीती ।। गूळ चण्याचा साधा प्रसाद भक्षीती ।

मंगल व्हावे म्हणुनि कथा श्रवण करिती ॥ २॥

जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती

अनन्य भावें तुजला स्मरुनी प्रार्थीती ।। त्याच्या हांकला तूं धांदुनिया येअसी ।

संतति वैभव कीर्ती धनदौलत देसी ॥३॥

विश्वाधारे माते प्रसन्न तू व्हावें ।

भवभय हरुनी आम्हां सदैव रक्षावें ।।

मनींची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ।।४।।


योगेश्वरी देवीची आरती

धन्य अंबापूर महिमा विचित्र।
पार्वती अवतार योगिनी क्षेत्र।।
दंतासुरमर्दोनी केले चरित्र।
सिध्दांचे स्थळ ते महापवित्र।।
जय देवी जय देवी जय योगेश्वरी।
महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी।।
जय देवी जय देवी…|
पतित पावन सर्व तीर्थ महाद्वारी।
माया मोचन सकळ माया निवारी।।
साधका सिद्धीवाणेच्या तिरी।
तेथील महिमा वर्णू न शके वैखरी।।
जय देवी जय देवी जय योगेश्वरी।

जय देवी जय देवी…|
सिद्ध लिंग स्थळ परम पावन।
नृसिंह तीर्थ तेथे नृसिंह वंदन।।
मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण।
संताचे माहेर गोदेवी स्थान !।।
जय देवी जय देवी जय योगेश्वरी।
महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी।।
जय देवी जय देवी…|
महारुद्र जेथे भैरव अवतार।
कोळ भैरव त्याचा महिमा अपार।।
नागझरी तीर्थ तीर्थाचे सार।
मार्जन करिता दोष होती संहार।।
जय देवी जय देवी जय योगेश्वरी।
महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी।।

अनंत रूप शक्ती तुझ योग्य माते।
योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते।।
व्यापक सकळा देही अनंत गुण भरिते।
निळकंठ ओवाळू कैवल्य माते।।
जय देवी जय देवी जय योगेश्वरी।
महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी।।
जय देवी जय देवी…


आरती सप्तश्रृंगी माता :-

जय देवी सप्तश्रृंगा अंबा गौतमी गंगा नटली ही ।

बहुरंगा उटी शेंदूर अंगा जय देवी सप्तश्रृंगा।। धृ ।।

पूर्व मुख अंबे ध्यान जरा वाकडी मान मार्कडेय देई कान ।

सप्तशतीचे पान एके अंबा गिरि श्रृंगा, अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तश्रृंगी। ।1।।

माये तुझा बहु थाट देई सगुण भेट प्रेम पान्हा एक घोट भावे भरले ।

पोट करू नको मनभंगा, अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तश्रृंगा। 12 ||

महिषीपुत्र म्हैसासुर दृष्टी कामे असुर करि दाल समशेर क्रोधे उडविली ।

शिर शिवशक्ती शिवगंगा, अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तश्रृंगा।।3।।

निवृत्ति हा राधासुत अंबे आरती गात अठराही तुझे हात भक्तां अभय देत ।

चरणकमल मनभंगा, अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तश्रृंगा | | 4 | |


आरती एकविरा आई

आरती एकविरा आई देई मज वरा चरण मी तुज लागे देई दर्शन

पामरा आरती एकविरा आई देई मज वरा आरती एकविरा

कार्ला घरी वास तुझा भक्त सह्याद्रीच्या पायी पूर्व दृष्टीने पाहून सांभाळी

त्या लवलाही आरती एकविरा आई देई मज वरा आरती एकविरा

चैत्राच्या शुद्ध पक्षी जेव्हा उत्सव तव होई भक्तगण मेळ काठी पालखी

ते मिरविती आरती एकविरा आई देई मज वरा आरती एकविरा

दर्यावरचे शूर वीरा तुझ्या पायी ते चाकर तव तूच

तारी त्यासी त्यांना एकची आधार आरती एकविरा

आई देई मज वरा आरती एकविरा

सप्त नक्षत्राचा वारा कुठे जीवालाही थारा क्षण तुज आठविता त्यांना

तारीसी तू माता आरती एकविरा आई देई मज वरा आरती एकविरा

तव पुजनी जे रमती मनोभावे स्मरूनी चित्ती तडे संकटास नेई कडाडून

प्रकट होसी आरती एकविरा आई देई मज वरा आरती एकविरा

शांत होई तुष्ट होई सेवा मान्य करी आई अभयाच्या देई वरा ठेवितो

मी चरणी शिरा आरती एकविरा आई देई

मज वरा शरण मी तुज लागे आरती एकविरा

देई दर्शन पामरा

आरती एकविरा


अंबा आरती

सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने । गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने ।

सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें । भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ।। १ ।।

जय देवी जय देवी वो जय अंबे । कोल्हापुराधिस्वामिणि तुज वो जगदंबे ।। धृ ।।

मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं ।

कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं । रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी ।

चिद्गगगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ॥ जय ॥ २॥

कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषें पीतांबर सुंदर कसियेला कांसे ।

कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे । पदकमळ लावण्ये अंबा शोभतसे ॥ जय || ३ ||

झळझळझळझळ झळकति तानवडें कर्णी ।

तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं । ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी

अद्भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ॥ जय ।। ४ ।।

अष्टहि भूजा सुंदर शोभतसे ।

झगझगझगझगझगति लावण्यगाभा ।

गम्हगम्हगम्हगम्हगीत समनांची शोभा ।।

त्र्यंबक मधुकर होऊनि वर्णितसे अंबा ।। ५ ।।


नवरात्र आरती

आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो ।

प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनि हो ।

मूलमंत्रजप करूनी भोवतें रक्षक ठेऊनि हो ।

ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो ।। १ ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो । धृ ॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो ।

सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।।

कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो ।

उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो । उदो ॥ २॥

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ।

मळकट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।।

कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो ।

अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ उदो ।। ३ ।।

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो ।

उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणीं हो ॥

पूर्ण कृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ।

भक्तांच्या माऊलि सुर ते येती लोटांगणी हो । उदो ।।४।।

पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो ।

अर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो ।

रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो ।

आनंदें प्रेम तें आलें सद्भावें क्रीडता हो ॥ उदो ।। ५ ।।

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो

घेऊनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ।

कवडी एक अर्पितां देसी हार मुक्तफलांचा हो ।

जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥ उदो ।। ६ ।।

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो ।

तेथें तूं नांदसी भोवतें पुष्पें नानापरी हो ।

जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।

भक्तसंकटी पडतां झेलूनि घेसी वरचे वरी हो ॥ उदो ।। ७ ।।

अष्टमीचे दिवशी अष्टभुजां नारायणी हो ।

सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।

मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो |

स्तनपान देऊनि सुखी केली अंतःकरणीं हो ॥ उदो ॥ ८ ॥

नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो।

सप्तशतीजप होम हवने सद्भक्ती करूनी हो ॥

षड्स अन्न नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो ।

आचार्यब्राह्मणां तृप्त केलें कृपेंकरूनी हो ॥ उदो । ९ ।।

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो ।

सिंहारूढे दारुण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो ।

विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ॥ उदो ।। १० ।।


सरस्वती माता
ॐ जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता।
सद्‍गुण वैभव शालिनी, त्रिभुवन विख्याता॥

जय….. चंद्रवदनि पद्मासिनी, ध्रुति मंगलकारी।

सोहें शुभ हंस सवारी, अतुल तेजधारी ॥ जय…..
बाएं कर में वीणा, दाएं कर में माला।
शीश मुकुट मणी सोहें, गल मोतियन माला ॥ जय…..
देवी शरण जो आएं, उनका उद्धार किया।
पैठी मंथरा दासी, रावण संहार किया ॥ जय…..
विद्या ज्ञान प्रदायिनी, ज्ञान प्रकाश भरो।
मोह, अज्ञान, तिमिर का जग से नाश करो ॥ जय…..
धूप, दीप, फल, मेवा मां स्वीकार करो।
ज्ञानचक्षु दे माता, जग निस्तार करो ॥ जय…..
मां सरस्वती की आरती जो कोई जन गावें।
हितकारी, सुखकारी, ज्ञान भक्ती पावें ॥ जय…..
जय सरस्वती माता, जय जय सरस्वती माता।
सद्‍गुण वैभव शालिनी, त्रिभुवन विख्याता॥ जय…

 


श्रीगीतेची आरती

जय देवी जय देवी जय भगवद्गीते । आरती ओवाळूं तुज वेदमाते ।। धृ ।।

सुखकरणी दुखहरणी जननी वेदांची । अगाध महिमा तुझा नेणे विरंची ।।

ते तूं ब्रह्मी होतिस लीन ठायींची ।

अर्जुनाचें भावें प्रकट मुखींची ।। जय ।। १ ।।

सात शर्ते श्लोक व्यासोक्तीसार ।

अष्टादश अध्याय इतुका विस्तार ।। स्मरणमात्रें त्यांच्या निरसे संसार । जय ।।२।।

अर्ध पाद करितां उच्चार।

तुझा पार नेणें मी दीन ।

अनन्यभावें तुजला आलों मी शरण ।।

सनाथ करीं माये कृपा करून ।

बापरखुमादेवीवरदासमान ॥ जय ॥ ३ ॥


देवीच्या आरत्या समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *