दुर्गा

श्री दुर्गादेवीची आरती

श्री दुर्गादेवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।।

जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।।
जय देवी जय देवी ।। धृ० ।।

त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।। २ ।।

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।। – समर्थ रामदास स्वामी

अर्थ : श्री दुर्गादेवीच्या आरतीमधील काही कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊया. शब्दार्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते. १. ‘वारी वारी जन्ममरणाते वारी’ यामधील ‘वारी’ या शब्दाचा अर्थ आहे ‘सोडव’ २. ‘चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही ।’ या ओळीचा अर्थ आहे की, देवीच्या स्वरूपाचे वर्णन करतांना चारही वेद थकले आणि सहा दर्शनेसुद्धा या विवादाच्या प्रवाहात वाहून गेली, म्हणजे त्यांनाही वर्णन करणे शक्य झाले नाही. अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो, अशी देवीच्या चरणी प्रार्थना आहे.


https://www.krushikranti.com/

श्री दुर्गादेवीची आरती

1 thought on “श्री दुर्गादेवीची आरती”

  1. या आरतीचा अर्थ दिल्या बद्दल धन्यवाद.
    देवीच्या अशाच अजून काही आरत्या असतील तर त्या जरूर प्रसृत कराव्या
    धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *