दासबोधांची आरती

वेदांतसंमतीचा काव्यसिंधू भरला ।श्रुतिशास्त्रग्रंथ साक्ष संगमू केला ।

महानुभव संतजनी अनुभव चाखियला । अज्ञान जड जीवां मार्ग सुगम केला ॥१॥

जय जयाजी दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा । आरती ओंवाळीन विमलज्ञान बाळबोधा ।। धृ ।।

नवविधा भक्तिपंथें रामरूपानुभवी । चातुर्यनिधि मोठा मायाचक्र उघवी ।।

हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावीं बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी ॥ जय ॥२॥

वीसही दशकींचा अनुभव जो पाहे । नित्यनेमें विवरीतां स्वयें ब्रह्मची होये ।।

अपार पुण्य गांठी तरी श्रवण लाही कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयीं ॥ जय ॥ ३ ॥


दासबोधांची आरती समाप्त