श्री अनंताची आरती
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू। भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ ।।
भाद्रपदमासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने । दुकूलदोरक करुनि पूजिति अनंत नामानें ।। १ ।।
नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती । षोडशपूजा करूनी द्वाह्मण संतर्पण करिती ॥ २॥
अपूप वायान दंपतिपूजन त्या दिवशी करिती । अनंत सन्तुष्टोनि देती संतति संपत्ती ।। ३।।
रामा धर्मे आचरीतां व्रत क्लेशांतुनि सुटला । कौडिण्याने पुजितां तुजला उद्धरिले त्याला ।। ४।।
मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी । संकटकाळी रक्षी अनंता आपुल्या दासासी ॥ ५॥