अंबा आरती
सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने ।
गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने ।
सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें ।
भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ।। १ ।।
जय देवी जय देवी वो जय अंबे ।
कोल्हापुराधिस्वामिणि तुज वो जगदंबे ।। धृ ।।
मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं ।
कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं ।
रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी ।
चिद्गगगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ॥ जय ॥ २॥
कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषें पीतांबर सुंदर कसियेला कांसे ।
कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे ।
पदकमळ लावण्ये अंबा शोभतसे ॥ जय || ३ ||
झळझळझळझळ झळकति तानवडें कर्णी ।
तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं ।
ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी
अद्भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ॥ जय ।। ४ ।।
अष्टहि भूजा सुंदर शोभतसे ।
झगझगझगझगझगति लावण्यगाभा ।
गम्हगम्हगम्हगम्हगीत समनांची शोभा ।।
त्र्यंबक मधुकर होऊनि वर्णितसे अंबा ।। ५ ।।
अंबा आरती समाप्त .